आमच्याबद्दल
सुमारे ४० वर्षांपूर्वी सुरू केलेला हा ब्रॅंड आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर होताना सोलापूरी भेळ परिवाराला अत्यंत आनंद होत आहे.
मी श्री. तुकाराम अशोक यादव राहणार तुळजापूर सोलापूरी भेळ या सुप्रसिद्ध ब्रॅंडचा संचालक आहे. माझे वडील अशोक पांडुरंग यादव यांनी १९८२ मध्ये तुळजापूर येथे पहिल्यांदा सोलापूरी भेळ हा ब्रॅंड चालू केला. त्यावेळी लोकांना भेळ पाणीपुरी कचोरी काय असतंय हे माहित सुद्धा नव्हते.. जसे जसे लोकांना माहिती होत गेले तशी गर्दी खुप होऊ लागली लोक आवडीने खाऊ लागले. जवळ जवळ वडिलांनी 19 वर्ष हा व्यवसाय चालवला, परत काही कारणामुळे वडिलांनी तो व्यवसाय बंद केला. या मधल्या काळामध्ये माझे शिक्षण व आम्ही लहान असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही पण मला सतत वाटायचं की हा व्यवसाय परत चालू करावा. शिक्षण झाल्यानंतर मी मेडिकल मध्ये 15 वर्ष काम केले. काम करत असताना सतत विचार यायचा वडिलांचा जुना व्यवसाय परत चालू करावा म्हणून मी परत 2019 मध्ये वडिलांना सोबत घेऊन हा व्यवसाय चालू केला. चालू केल्यानंतर मला असे लक्षात आले की आपली भेळ,पाणीपुरी,कचोरी, दहीपुरी,दहीवडा,चमन भेळ, पाव चटणी, हे सर्व पदार्थ खायला चविष्ट आणि सगळ्या पेक्षा भारी आहेत म्हणून मी ठरवलं की याचा आपण ब्रँड करायचा आणि तो आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावायचे हे ठरवलं. म्हत्वाचं म्हणजे हे सर्व पदार्थ पुर्ण पणे नॅचरल आहेत.
एक आठवण
माझे वडील अशोक पांडुरंग यादव यांनी १९८२ साली सुरू केलेला सोलापूरी भेळ (अगदी सुरवातीचे नाव ओम चौपाटी भेळ) हि आमच्यासाठी एक खास आठवण आहे, त्यांनी त्याकाळात दिलेली दर्जेदार चव आजही किंचितसे बदल करत आम्ही कायम ठेवली आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून तुळजापुरात येणारा व्यक्ती आमची सोलापूरी भेळ खायला आवर्जून येतो.
हि आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे! आपला असाच स्नेह राहू द्या..